top of page

William Shakespeare's Sonnets

Translated into Marathi by Chandrakant Kaluram Mhatre

Sonnet 18
Shall I Compare Thee to a Summer's Day

Source Text

Shall I compare thee to a summer’s day?

Thou art more lovely and more temperate:

Rough winds do shake the darling buds of May,

And summer’s lease hath all too short a date;

 

Sometime too hot the eye of heaven shines,

And often is his gold complexion dimm'd;

And every fair from fair sometime declines,

By chance or nature’s changing course untrimm'd;

 

But thy eternal summer shall not fade,

Nor lose possession of that fair thou ow’st;

Nor shall death brag thou wander’st in his shade,

When in eternal lines to time thou grow’st:

  

 So long as men can breathe or eyes can see,

   So long lives this, and this gives life to thee.

​

Target Text

करू का तुलना तुझी मी उन्हाशी सकाळच्या कोवळ्या?

पण तू तर आहेस अधिक आल्हादक आणि अधिक मवाळ :

उन्मत्त वाऱ्यांचे सोसतात आघात वसंताच्या लाडक्या कळ्या,

आणि कोवळ्या उन्हाची उमर अवघी सरते किती तात्काळ;

​

आकाशातील डोळा कधी प्रकाशतो उष्णता अतिप्रखर,

तर पुष्कळदा असते झाकोळलेले त्याचे तेज सोनेरी ;

आणि गमावते सौंदर्य कधी ना कधी प्रत्येक गोष्ट सुंदर,

योगायोगाने अथवा अगदी सहज निसर्गचक्रानुसारी;

​

पण तुझी चिरंतन कोवळी उन्हे कधी सरणार नाहीत,

ना गमावशील तू कधीही ते सौंदर्य तुझे आत्मगत;

मृत्यूदेखील ओढू धजणार नाही तुला त्याच्या सावलीत,

जेव्हा चिरंतन ह्या ओळींत तू करशील काळावर मात :

​

जोपर्यंत माणसे श्वास घेतील अथवा डोळ्यांनी बघतील,

तोपर्यंत ह्या राहतील, आणि ह्या तुला जीवनदान देतील.

bottom of page