The Tower (1928)
William Butler Yeats
Translated into Marathi by Chandrakant Kaluram Mhatre
(An ongoing project)
Marathi translations from W. B. Yeats’ The Tower (1928), undertaken as part of an ongoing project to translate major works of world poetry into Marathi. Prepared in the lead-up to the centennial year of the collection in 2028, these translations attempt to retain the formal, symbolic, and musical qualities of Yeats’ poetry while bringing them into conversation with Marathi poetic traditions.
Featured Poem
Sailing to Byzantium - समुद्रस्वारी बायझंटाइनकडे
Source Text
I
That is no country for old men. The young
In one another's arms, birds in the trees,
—Those dying generations—at their song,
The salmon-falls, the mackerel-crowded seas,
Fish, flesh, or fowl, commend all summer long
Whatever is begotten, born, and dies.
Caught in that sensual music all neglect
Monuments of unageing intellect.
II
An aged man is but a paltry thing,
A tattered coat upon a stick, unless
Soul clap its hands and sing, and louder sing
For every tatter in its mortal dress,
Nor is there singing school but studying
Monuments of its own magnificence;
And therefore I have sailed the seas and come
To the holy city of Byzantium.
III
O sages standing in God's holy fire
As in the gold mosaic of a wall,
Come from the holy fire, perne in a gyre,
And be the singing-masters of my soul.
Consume my heart away; sick with desire
And fastened to a dying animal
It knows not what it is; and gather me
Into the artifice of eternity.
IV
Once out of nature I shall never take
My bodily form from any natural thing,
But such a form as Grecian goldsmiths make
Of hammered gold and gold enamelling
To keep a drowsy Emperor awake;
Or set upon a golden bough to sing
To lords and ladies of Byzantium
Of what is past, or passing, or to come.
Target Text
१
तो काही म्हाताऱ्यांसाठीचा देश नाहीये. तरणेताठे
एकमेकांच्या कुशीत, पक्षी झाडांवर,
—त्या मरू घातलेल्या पिढ्या—त्यांच्या गीतांत,
रावसांचे धबधबे, तरळ्यांनी तुडुंबलेले समुद्र,
मासे, मांस, किंवा पाखरं, वाखाणतात बहराच्या मोसमभर
जे जे काही पैदा केले जाते, जन्मते, आणि मरते.
त्या भोगासक्त संगीतात अडकून सारी उपेक्षितात
म्हाताऱ्या न होणाऱ्या प्रज्ञेची स्मारके.
२
म्हातारा माणूस असतो फक्त एक क्षुल्लक गोष्ट,
काठीवर उभारलेला फाटका कोट, ज्यावर उपाय :
आत्म्याने टाळ्या वाजवून गाणे, आणि अधिक मोठ्याने गाणे
आपल्या मर्त्य पोशाखातील चिंधी-चिंधीच्या प्रमाणात,
गायनाची कोठे शाळाही नाहीये फक्त अभ्यास हवा
आपल्या स्वतःच्या भव्यतेच्या स्मारकांचा;
आणि त्यासाठी मी समुद्रावर स्वार होऊन आलोय
बायझंटाइनच्या पवित्र शहरात.
३
भिंतीवरील सोनेरी मोझेकमध्ये चितारल्याप्रमाणे
परमेश्वराच्या पवित्र अग्नीत उभ्या असलेल्या ऋषींनो,
त्या पवित्र अग्नीतून या, गिरक्या घेत वर झेपावत या,
आणि माझ्या आत्म्याचे गायन शिक्षक बना.
माझ्या हृदयाला वितळवून टाका; वासनेने आजारलेले
आणि मरू घातलेल्या जनावराला बांधलेले
त्याचे त्याला ज्ञात नाही ते काय आहे; आणि मला गोळा करून
बनवा अनंतकाळची कलाकृती.
४
एकदा निसर्गातून बाहेर पडल्यानंतर मी कधीच घेणार नाही
माझा देहाकार कोणत्याही नैसर्गिक गोष्टीकडून,
घेईन फक्त असा आकार जसा ग्रीक सोनार बनवतात
घडवलेल्या सोन्याचा आणि सोनेरी मुलाम्याचा
एखादया पेंगणाऱ्या सम्राटाला जागे ठेवण्यासाठी;
किंवा बायझंटाईनच्या घरंदाज पुरुष व पुरंध्रींकरिता
सोनेरी फांदीवर बसून ते सर्व गाण्यासाठी
जे काही घडले आहे, किंवा घडत आहे, किंवा घडणार आहे.